नोकरी शोधताय? आरोग्य विभाग भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी पास / नापास | अधिकृत जाहिरात येथे.

आरोग्य क्षेत्रात नोकरी पाहिजे? राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत वाहनचालक ही पदे भरण्यात येत आहेत. एकूण 05 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार सातारा येथे काम शोधत असतील त्यांना उत्तम संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही १० पास/नापास वाहनचालन परवाना (LMV-TR) असणे आवश्यक आहे. ४२ वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. PDF जाहिरात पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 ऑक्टोंबर 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता हा जिल्हा रुग्णालय, सातारा आहे. जाहीरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत व नियुक्ती ठिकाणात बदल होऊ शकतो याबाबतचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा यांनी राखुन ठेवले आहेत. पदसंख्येत बदल झालेस त्याबाबत उमेदवारांना आक्षेप घेता येणार नाही. सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणतेही आक्षेप असलेस यांचे निवारण करणेचे अधिकार मा. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय सातारा यांना राहतील. अर्जदाराला रोजंदारी तत्वावरील कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.

भविष्यामध्ये बदली नाही याची नोंद घ्यावी. भरती प्रक्रिया स्थगित करणे/रह करणे/पदभरती प्रक्रियेत बदल करणे / अटींमध्ये बदल करणे याचे सर्व अधिकार मा. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा यांचे स्तरावर राखिव ठेवण्यात आलेले आहेत, याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही. उमेदवाराने विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतींसह जिल्हा रुग्णालय, सातारा येथे समक्ष दिनांक २४/१०/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत थेट मुलाखतीस उपस्थित राहून सादर करावेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo