10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांची महावितरणसाठी जाहिरात प्रसिद्ध | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या, विभागांतर्गत सत्र 2025-2026 करीता खालील व्यवसायाकरीता 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जाहिरात कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या, संवसु विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Mahavitaran Bharti 2025 : Applications have been invited online from 10th and ITI passed candidates for the following professions for the session 2025-2026 under Maharashtra State Electricity Distribution Company, Marya Department. However, interested and eager candidates should submit their applications as soon as possible.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या, संवसु विभाग द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : वीजतंत्री, तारतंत्री, कोपा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण. (अधिकृत pdf .जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.
◾प्रशिक्षण कालावधी : एक वर्ष कालावधी करीता खालील व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणा करीता निवड करावयाची आहे.
◾पदाचे नाव : वीजतंत्री (Electrician, तारतंत्री (Wireman), कोपा-पासा (Copa).
◾इतर आवश्यक पात्रता :
(1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (महाराष्ट्र राज्य माध्यमिक परिक्षा बेस्ट 5 चे गुण ग्राह्य धरले जाणार नाही.
(2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री, तारतंत्री व कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (MSBTE) या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रीशियन दोन वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे वीजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुध्दा अर्ज करण्याकरीता पात्र समजण्यात येईल.
◾एकूण पदे : 049  रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : आर्वी, जिल्हा- वर्धा.
◾उमेदवारांचे वय 18 वर्ष पुर्ण असणे आवश्यक व कमाल 30 वर्ष असावे तसेच राखीव उमेदवारांकरीता वयाची अट 05 वर्ष शिथिलक्षम राहील.
◾फक्त महावितरण आर्वी विभाग यांच्या कार्यालय क्षेत्रांर्तगत रहिवासी असल्यास उमेदवार अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. तसेच वर्धा जिल्ह्यातील अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांनी ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक अचुक नमुद करावा.
◾प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष राहील. 5) इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज जाहीरातीच्या दिनांकापासुन ते 10.11.2025 पर्यंत या कार्यालयाचा आस्थापना क्रमांक E05202702794 यावर योग्य व परिपुर्ण माहीतीसह सादर करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
◾ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., विभागीय कार्यालय, कदम बिल्डींग, वसंत नगर, आर्वी ता. आर्वी जि. वर्धा येथे जाहीरात प्रकाशित झाल्या पासुन ते अंतिम तारीख पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 पर्यंत अर्ज स्वतः सादर करणे आवश्यक. कार्यालयास प्राप्त अर्जाचाच विचार करण्यात येईल.
◾शिकाऊ उमेद्वार यांची निवड माध्यमिक शालांत परिक्षेच्या गुणांची टक्केवारी SSC तसेच आय.टी.आय. गुणांची टक्केवारी याची सरासरी विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करून शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येईल.
◾जाहीरातीमध्ये अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहिरात रदद् करण्याचे अधिकार कंपनी राखुन ठेवित आहे.
◾ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
◾ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड सादर करण्याची शेवटची तारीख: दि. 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
◾ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत  सादर करण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., विभागीय कार्यालय, कदम बिल्डींग, वसंत नगर, आर्वी ता. आर्वी जि. वर्धा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo