
महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये गट-क (Group C) अंतर्गत पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक या पदांसाठी ही भरती केली जात आहे. एकूण 0938 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता, आरक्षण नियम, वयोमर्यादा, परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम यासंबंधी सर्व माहिती आयोगाच्या https://mpsc.gov.in आणि https://nagacoaline.gov.in या वेबसाईटवर दिली आहे.
तुमची शैक्षणिक पात्रता पदवीधर असेल तर तुम्ही पात्र आहेत. ₹29,200 ते ₹92,300 वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाईल. 27 ऑक्टोबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. उमेदवारांचे वय 55 वर्षांपर्यंत स्वीकारले जाणार आहे. ही भरती महाराष्ट्रातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये होणार असून, महाराष्ट्रातच नोकरीचे ठिकाण राहील. इच्छुकांनी दिलेल्या तारखेत अर्ज सादर करून आपली पात्रता निश्चित करावी आणि अधिकृत PDF जाहिरात खाली पहा.