
नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सांगली मध्ये आयएफसी ब्लॉक अँकर (सेवादाता) ही एकूण 06 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना सांगली येथे नोकरी करावी लागणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन: कमाल दरमहा रु. २०,०००/- (मासिक प्रवास भत्ता रु. २०००/-) मिळणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही १८ वर्षे ते ४३ वर्षे आवश्यक आहे.
तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2025 आहे. संबंधित प्रभागसंघ निवड केलेल्या IFC Block Anchor यांचा ११ महिन्यांचा करार करतील व त्यांच्या कामाचे मूल्यमापन प्रभागसंघ करेल, प्रगती समाधानकारक असल्यास १ दिवसाचा खंड देऊन पुढील मुदतवाढ मिळेल. संगणकीय कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सदर पद हे सेवादाता म्हणून काम पाहतील व सर्व प्रवर्गासाठी खुले राहील.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
IFC Block Anchor (सेवादाता) यांच्या सेवा IFC प्रकल्प कालावधीपर्यंतच मर्यादित असून, उमेदवारास कुठल्याही शासकीय सेवेवर हक्क सांगता येणार नाही. अंतिम निवड लेखी व मुलाखत गुणांच्या आधारे केली जाईल. अर्जदाराने नमूद निकषानुसार आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स, फोटो व आधार कार्ड अर्जासोबत जोडणे आवश्यक. अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २० २५ (सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळत).
निवड प्रक्रियेतील अंतिम निर्णय तसेच निवड प्रक्रिया कोणत्याही टप्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हा अभियान संचालक यांचेकडे राखीव राहतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 नोव्हेंबर 2025 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस व शिराळा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.